साहित्य :
२ मेडीअम कांदे मोठे-मोठे चिरून
५-७ लसून पाकळ्या तुकडे करून
३-४ चमचे सुके खोबरे भाजून चुरलेले
मोडाची मटकी
२ चमचे कोल्हापुरी घरात मिसळलेले तिखट/नसेल तर मिरची पूड
गरम मसाला
मीठ चवीप्रमाणे
३-४ चमचे तेल
जिरे,मोहरी,हळद,हिंग
सर्व्ह करताना : फरसाण,बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर-ओले खोबरे,लिंबू
कृती :
१) कांदा,लसून,खोबरे mixer ला जाडसर वाटून घ्यावे.( बारीक पेस्ट करू नये )
२) तेलात जिरे,मोहरी,हिंग फोडणी करून त्यात कांद्याचे वाटण चांगले गोल्डन रंग होईपर्यंत परतावे. मग त्यात तिखट,हळद,गरम मसाला घालून २ मीनटे पुन्हा परतावे.
३) जरुरीप्रमाणे पाणी व मीठ घालून आधन उकळू द्यावे.
४) मोडाच्या मटकीची नेहमीप्रमाणे उसळ बनवून घ्यावी. मटकी नुसती उकडून मीठ लावून घेतली तरी चालते.
५) एका बाउल मध्ये प्रथम अर्धा ते एक कप फरसाण घ्यावा.त्यावर मटकीची उसळ घालावी.मग त्यावर आधन घालून वरून कांदा-कोथिंबीर-खोबरे घालून सर्व्ह करावे.मिसळीबरोबर पाव आणि लिंबू हि द्यावा.